पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथेचा वाद आता थेट न्यायालयाच्या दारात गेला आहे. मूळ कथा ही क्रीडालेखक संजय दुधाणे यांची असून, त्यांनी कॉपीराइटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, संस्थेमार्फत दि. ०६ डिसेंबर, २०२८ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन पर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. चैत्यभूमी दादर, मुंबई येथे आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत न्यायालयाने नागराज मंजुळे यांच्यासह सर्वांना समन्स पाठवले आहे.
ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास घडविणाऱ्या खाशाबा जाधत यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क २००१ पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉपीराइट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे. चित्रपटाची निर्मिती व प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई व ठरावासाठी दुधाणे यांच्याकडून अॅड. रवींद्र शिंदे व अॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत जातीने हजर राहण्याचे समन्स न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे व ज्योती देशपांडे यांना पाठवले आहेत.
नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. कोरोनापूर्वी २०१९ मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाबाबत रणजित जाधव यांच्याशी करार केला होता. मुळात रणजित जाधव यांनीच ३० ऑगस्ट २०१३ रोजी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन खाशाबांच्या चित्रपटाची कथा ही संजय दुधाणे यांची असल्याचे घोषित केले होते. आता रणजित जाधव यांनी संजय दुधाणे यांना डावलून संमती करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
‘ऑलिम्पिकवीर खाशावा जाधव’ या पुस्तकाच्या आधारे तेजपाल वाघ यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली होती. त्यांनी पटकथा व संशोधन सर्व नागराज मंजुळे यांच्याकडे सुपूर्त केले होते. असे असताना संजय दुधाणे यांना अंधारात ठेवून मंजुळे चित्रपट निर्मिती करीत असल्याने हा वाद न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे.