सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे सर्दी, घसा खवखवणे, व्हायरल इन्फेक्शन अशा समस्या उद्भवू शकतात. त्यात तापमानात घट झाल्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे देखील हे घडते. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय यावर प्रभावी ठरू शकतात. कारण, हा एक उपाय दहा आजारांवर रामबाण पर्याय ठरू शकतो.
ओवा सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांना तोंड देण्यास मदत होते. ओव्याचा वापर केवळ शारीरिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठीच नाही तर पचन, वजन कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. घसा दुखत असेल किंवा सूज येत असेल तर ओव्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. ओवा तोंडात ठेवून त्याचा रस घेतल्याने घशाच्या समस्यांपासून आराम मिळतो. त्याचा प्रभाव गरम असून, ज्यामुळे घशातील सूज कमी होण्यास मदत होते आणि संसर्गापासून आराम मिळतो.
तसेच सर्दीदरम्यान घशाचा त्रास लवकर बरा करण्यासाठी ओवा एक प्रभावी घरगुती उपाय ठरू शकतो. हिवाळ्यात सर्दी-खोकल्यासारख्या समस्या वारंवार उद्भवतात. अशा परिस्थितीत ओव्याचे सेवन शरीराला आराम देण्याचे काम करते. चहामध्ये ओवा घालून प्यायल्यास किंवा चघळल्यास सर्दी आणि खोकल्यापासून खूप आराम मिळतो. याशिवाय ओव्याच्या सेवनाने शरीराच्या आतून उष्णता निर्माण होते, ज्यामुळे थंड वातावरणात शरीर उबदार राहते आणि थंडीपासून आराम मिळतो.