नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. पण, तरीदेखील कोणता फोन घ्यावा, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातच Human Mobile Device (HMD) ने भारतात HMD Fusion नावाने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक स्लीक स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये अनेक चांगले फीचर्स आणि मॉड्यूलर सपोर्ट आहे.
HMD च्या या फोनमध्ये 108 MP रियर आणि 50 MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये आउटफिट सपोर्ट देखील देण्यात आला आहे, ज्यासाठी या हँडसेटमध्ये पोगो पिन आहेत. HMD Fusion मध्ये स्मार्ट आउटफिटचा पर्याय आहे. त्याच्या मदतीने युजर्स त्यांच्या गरजेनुसार मॉड्युलरला फोनशी कनेक्ट करू शकतात. Xiaomi 14 Ultra मध्ये या प्रकारचा मॉड्युलर सपोर्ट देण्यात आला होता, ज्यासोबत फोटोग्राफी किट जोडता येऊ शकतो.
Xiaomi 14 Ultra ची भारतात किंमत एक लाख रुपये किंमत आहे. HMD Fusion ची लाँच ऑफर 15,999 रुपये आहे, ज्यामध्ये बँक ऑफर्स देखील समाविष्ट आहेत. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे आणि Amazon India वर उपलब्ध असेल. या हँडसेटची पहिली विक्री 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. HMD Fusion वर लाँच ऑफर संपल्यानंतर, त्याची किंमत 17,999 होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.