तुम्ही कधी दु:खी किंवा निराश असता तेव्हा आपली नाराजी विविध पद्धतीने व्यक्त करता. काही लोकं निराश झाल्यावर जास्त खात असतात. अशा स्थितीत आपण भूक न लागता खातो. तेव्हा हे इमोशनल इटिंगचं लक्षण असू शकतो. त्यामुळे याकडे लक्ष देणं गरजेचे आहे.
जेव्हा तुम्ही नकारात्मक भावनांनी त्रस्त असता तेव्हा अन्नाची लालसा निर्माण होते. या स्थितीत भूक न लागता खाण्याची इच्छा होते. जेव्हा आपण तणावापासून मुक्त होण्यासाठी खातो तेव्हा त्यालाच ‘इमोशनल इटिंग’ म्हणतात. जेव्हा तुम्हाला भूक नसतानाही खावेसे वाटते, तेव्हा ते इमोशनल इटिंगचं लक्षण असू शकते. जेव्हा लोक ताणतणाव, दुःखी किंवा एकटे वाटतात तेव्हा जास्त खातात. इमोशनल इटिंगमुळे ग्रस्त असलेली व्यक्ती भूक न लागता जास्त खातो. पण नंतर त्याला त्रास होतो.
इमोशनल इटिंगमुळे आपल्या मेंदूच्या लॅटरल हायपोथालेमस (LH) मध्ये बदल होऊ शकतात. लॅटरल हायपोथालेमस हा मेंदूचा भाग आहे जो भूक, तहान, झोप आणि हार्मोन्स नियंत्रित करतो. या बदलामुळे आपण साखर आणि चरबीयुक्त अन्नाकडे अधिक आकर्षित होतो. हे आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर देखील परिणाम करू शकते.