मुंबई : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या घडामोडी दिसून आल्या होत्या. आठवड्याच्या चार दिवसांत सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ दिसून आली. सेन्सेक्सच्या टॉप-10 व्हॅल्यूएबल कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी झेप नोंदवली गेली. त्यात एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला आणि त्यांनी अवघ्या चार दिवसांत 40,000 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.
शेअर बाजारातील 30 शेअर्सचा प्रमुख निर्देशांक 1,536.8 अंकांनी वाढला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारीच बीएसई सेन्सेक्स 1,961.32 अंकांनी वाढून 79,117.11 वर बंद झाला. दरम्यान, NSE निफ्टीनेही 374.55 अंकांची वाढ नोंदवली गेली होती. गेल्या आठवड्यात, BSE च्या शीर्ष 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 1,55,603.45 कोटी रुपयांनी वाढले.
ज्या कंपन्यांचा शेवटचा आठवडा गुंतवणूकदारांसाठी चांगला ठरला आहे. त्यामध्ये एचडीएफसी बँकेचे गुंतवणूकदार आघाडीवर आहेत. HDFC बँकेचे बाजार भांडवल (HDFC Bank MCap) वाढून 13,34,418.14 कोटी झाले. त्यानुसार, अवघ्या चार दिवसांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या कमाईत 40,392.91 कोटी रुपयांची मोठी वाढ झाली आहे. यानंतर टाटा समूहाची कंपनी TCS चे बाजार मूल्य 36,036.15 कोटी रुपयांनी वाढून 15,36,149.51 कोटी रुपये झाले.