पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर वारजे पुलाजवळ रविवारी (दि.24) सकाळी गॅस टॅंकर पलटी झाल्याची दुर्घटना घडली. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णत ठप्प झाली होती, यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
मुंबईहून साता-याच्या दिशेने जाणा-या या टॅंकरचा अचानक तोल गेल्यामुळे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. गॅस टॅंकरमधून गळती होण्याचा धोका असल्यामुळे सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघातास्थळी विशेष टीम पाठवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु होते. अपघातामुळे मुंबईकडून साता-याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
घटनास्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच त्याठिकाणी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती.