IND vs AUS : पर्थमध्ये भारत विरूदध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिली टेस्ट खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड जमवली असून युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने तडाखेदार शतक ठोकलं आहे. यशस्वी ऑस्ट्रेलिया टीमवर चांगलाच भारी पडलेला दिसला. या सामन्यात कांगारूंच्या गोलंदाजीला धु-धु धुत यशस्वीने शतक झळकावले आहे. या सामन्यात शतक ठोकत यशस्वीने एक खास विक्रम देखील स्वतःच्या नावे केला आहे.
सामान्याच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वालने त्याचं शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे त्याने थेट सिक्स लगावत शतक पूर्ण केलं आहे. यशस्वी जयस्वालचं टेस्ट कारकिर्दीतील हे चौथं शतक ठरलं. ऑस्ट्रेलियात भारतासाठी डेब्यू सामन्यात शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. एमएल जयसिम्हा आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर खेळल्या गेलेल्या पहिल्याच टेस्टमध्ये शतक करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. .
जयस्वाल ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा चौथा सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरला असून त्याने परदेशात दुसरं शतक झळकावलं आहे. यापूर्वी यशस्वीने वेस्ट इंडिजमध्ये शतक झळकावलं होतं.
पर्थ टेस्टमध्ये जयस्वाल पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता, पण दुसऱ्या डावात त्याने जोरदार कमबॅक करत शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतकं झळकावणारा तो दुसरा युवा ओपनर आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये डेब्यू टेस्टमध्ये शतक झळकावणारे भारतीय फलंदाज..
1967-68 : एमएल जयसिम्हा, ब्रिस्बेन – 101
1977-78 : सुनिल गावस्कर, ब्रिस्बेन – 113
2024 : यशस्वी जयस्वाल,पर्थ, – 141*