पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे ज्येष्ठ निवासी, अर्थ सहाय्यक प्राध्यापक, शरीरशास्त्र सहाय्यक प्राध्यापक, नेत्ररोग तज्ञ सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला रत्नागिरी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही 28 नोव्हेंबर 2024 रोजी घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://gmcratnagiri.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्येष्ठ निवासी, अर्थ सहाय्यक प्राध्यापक, शरीरशास्त्र सहाय्यक प्राध्यापक, नेत्ररोग तज्ञ सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी.
– नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 28 नोव्हेंबर 2024.
– मुलाखतीची पत्ता : डीन कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी.