आपण सुदृढ राहावं यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. त्यात जर तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारायचे असेल आणि तुमचे शरीर बळकट करायचे असेल, तर तुम्ही आता बदाम आणि आक्रोडांपेक्षा अधिक शक्तिशाली असलेल्या ड्रायफ्रुटचा आहारात समावेश करावा.
टायगर नट्स असे या ड्रायफ्रुटचे नाव आहे. ज्याला हिंदीमध्ये चुफा नट किंवा अर्थ नट देखील म्हणतात. टायगर नट्समध्ये सर्व पोषकतत्व असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. टायगर नट्समध्ये असलेले आहारातील फायबर पाचन तंत्रासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज 10 ग्रॅम सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे अन्नाची लालसा कमी होते, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यताही कमी होते.
टायगर नट्समध्ये 18 प्रकारचे अमिनो ॲसिड असतात, ज्यामध्ये लाइसिन आणि ग्लाइसिन सारख्या अत्यावश्यक अमिनो ॲसिड असतात. हे अमिनो ऍसिड हाडे, स्नायू आणि संयोजी ऊतकांसाठी फायदेशीर असतात आणि शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करतात.
तसेच रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित करण्याचे कार्य करतात. टायगर नट्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामध्ये असलेले फायबर साखरेचे शोषण कमी करते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची समस्या टाळते. त्यामुळे टायगर नट्सचा आहारात अवश्य समावेश करावा.