मुंबई: भारताचा बांगलादेश दौऱ्याला उद्यापासून (दि. ४ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची निवड करण्यात आली होती. मात्र, सर्व करताना हाताला दुखापत झाल्याने या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले असून त्याजागी वेगवान गोलंदाज उमरान मलिकची निवड करण्यात आली आहे.
आगामी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीकोनातून या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. टी २० विश्वकरंडक स्पर्धेत भारताची कामगिरी म्हणावी तितकी चांगली झाली नव्हती. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध देखील एकदिवसीय मालिका भारताला गमवावी लागली होती. त्यामुळे चांगले प्रदर्शन करताना छाप पाडण्याची संधी नवोदित खेळाडूंना या दौऱ्याच्या निमित्ताने असणार आहे.
या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात मोहम्मद शमीला स्थान देण्यात आले होते. मात्र, सरावादरम्यान शमीच्या हाताला दुखापत झाली. यामुळे शमीला स्पर्धेतून वगळून त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला स्थान देण्यात आले असल्याचे बीसीसीआयने ट्विट करून सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात उमरान मलिकने चांगली कामगिरी केली होती.
या दौऱ्यात भारतीय संघ एकदिवसीय मालिका व कसोटी खेळणार आहे. त्यामुळे कसोटी मालिकेपर्यंत शमी तंदुरुस्त होऊ शकणार आहे.
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी (जखमी), मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.