पुणे : आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे 57045 हजार मतांनी आघाडीवर आहे.
गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता. या पार्श्वभूमीवर, 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होत आहे.
विजय शिवतारे पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार आहे. तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप 37854 पिछाडीवर आहे.