पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. सुरवातीला टपाल मतमोजणी सुरु असून सुरवातीच्या कलामध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे दत्तात्रय भरणे 3749 मतांनी आघाडीवर आहते. तर मविआचे हर्षवर्धन पाटील पिछाडीवर आहेत. अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होत आहेत.
मतमोजणीला सुरुवात झाली असून इंदापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे दत्तात्रय भरणे आघाडीवर आहेत. महाविकास आघडीचे हर्षवर्धन पाटील पिछाडीवर दिसत आहेत. इंदापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून दत्तात्रय भरणे मैदानात आहेत तर महाविकास आघाडीकडून हर्षवर्धन पाटील मैदानात उतरले आहेत.