विशाल कदम
जिंती : पुणे-अमरावती एक्सप्रेसला जिंती (ता. करमाळा) रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला असून शुक्रवारी (ता. १६) पासून गाडी सुरु होणार आहे. या नवीन एक्सप्रेसगाडीच्या थांब्यामुळे जिंतीकर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे-अमरावती एक्सप्रेस बंद केली होती. मात्र आता प्रशासनाने पुणे हि गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हि गाडी शुक्रवारी (ता. १६) पासून सुरु होणार आहे. आणि या गाडीला जिंती रोड स्थानकावर नव्याने थांबा देण्यात आला आहे. पुणे-अमरावती एक्सप्रेस हि सध्या १६ डिसेंबर पासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असून २६ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहील. पुण्याकडून अमरावतीच्या दिशेने हि गाडी शुक्रवार आणि रविवारी धावेल. तर अमरवती कडून पुण्याच्या दिशेने शनिवार आणि सोमवारी धावेल.
जिंती गाव करमाळ्या तालुक्यातील अत्यंत महत्वाचे गाव आहे. जिंती येथे मोठी बाजारपेठ असून शेजारील १५ हून अधिक गावांचा कारभार येथून चालतो. तसेच गावापासून २ किलोमीटर अंतरावर मकाई सहकारी साखर कारखाना आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ व कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पुणे किंवा सोलापूरला कामानिमित्त जायचे असेल तर एकमात्र साधन पुणे-सोलापूर पासेंजर आहे. मात्र नागरिकांच्या वेळेत नसल्यामुळे नागरिकांना अडचण येत होती. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत होता.
दरम्यान, जिंती रेल्वे स्थानकावर पुणे-अमरावती एक्सप्रेसला थांबां मिळाल्याने नागरिकांची कामे होणार आहेत. पुणे व सोलापूरच्या दिशेने जायचे असेल तर आता सुखकर प्रवास होणार आहे. यामुळे नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुणे-अमरावती एक्सप्रेसचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे (कंसात वार आणि वेळ)
*गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती*
१)पुणे- रात्री १०.५० (शुक्रवार आणि रविवार रोजी सुटेल)
२)दौंड-रात्री १२.०७ (दुसरा दिवस)
३)जिंती रोड – रात्री १२.३० मध्य रात्री येईल)
४)जेऊर – रात्री १.०० (जेऊर ला शनिवार आणि सोमवार)
५)कुर्डुवाडी – रात्री १.२५
६)लातूर- सकाळी ६.२० (दुसरा दिवस)
७)परळी – सकाळी ८.०२५
८)अमरवती- संध्याकाळी ५.३०
अमरावती- पुणे एक्सप्रेसचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे (कंसात वार आणि वेळ)
*गाडी क्रमांक ०१४४० अमरावती -पुणे*
१) अमरवती – रात्री ७.५० (शनिवार आणि सोमवार रोजी सुटेल) २)परळी- सकाळी ५.२० (दुसरा दिवस)
३)लातूर- सकाळी ७.५०
४)कुर्डुवाडी – सकाळी ११.४५
५)जेऊर- दुपारी १२.४० (रविवार आणि मंगळवार रोजी दुपारी येईल)
६)जिंती- दुपारी ०१.४०
७)दौंड- दुपारी २.५०
८)पुणे- दुपारी ४.२०