मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कागदविरहित अर्थात संगणकीकृत करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. ही संगणकीकृत प्रक्रिया टप्याटप्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे. महारेरा प्राधिकरणाने यापूर्वी डिजिटल प्रणालीला प्राधान्य देत कागदविरहित प्रणाली अंमलात आणली. त्यानुसार, म्हाडानेही ई-कार्यप्रणालीला म्हणजेच कागदविरहित कारभाराचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मंजूर केला.
कागदांनी भरलेली कपाटे रिक्त व्हावीत आणि म्हाडा कार्यालयाने मोकळा श्वास घ्यावा, यासाठी कागदविरहित प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. कागदविरहित प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी टप्याटप्पटीने सुरू करण्यात येणार आहे. या संगणकीकृत प्रणालीमध्ये घरांचा पुनर्विकाससाठी ना हरकत प्रमाणपत्र, गृहनिर्मिती, सोडतीची नोंदणी व जुन्या इमारतीचे रेकॉर्ड, रहिवाशांना रहिवाशांची माहिती, जुन्या नोंदणी, म्हाडा भूखंडाचा भाडेपट्टा करार, थकबाकी अशा अनेक बाबीसाठी संगणकीकृत कार्यप्रणाली उपयुक्त ठरेल.