Maharashtra Election 2024 Voting : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणूक आयोगाने मतदानासंदर्भात सर्व तयारी केली आहे. विधासभेच्या सर्व 288 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुती वि. महाआघाडी असा सामना रंगणार असून मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सात वाजताच मतदान केलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच बोलतानान ते म्हणाले की, राज्यात महायुतीचं बहुमताचं सरकार येईल. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यावर अजित पवार म्हणाले, आम्हाला बहुमत मिळाल्यानंतर आम्ही तुझ्याशी (प्रसारमाध्यमाचा प्रतिनिधी) चर्चा करून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेऊ.
#WATCH | Baramati: Maharashtra Deputy CM and NCP candidate from Baramati Assembly constituency, Ajit Pawar shows his inked finger after casting his vote for #MaharashtraElection2024
He says “Mahayuti is going to form the government here…” pic.twitter.com/oGsCBMMbsL
— ANI (@ANI) November 20, 2024
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कुलाबा मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तसेच नागरिकांना मतदान करण्याचे करण्याचा आवाहन केले. त्यांनी म्हटले की, प्रत्येकाने मतदानाला हजेरी लावावी, हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क आहे. कोणी कोणाला मतदान करावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे, परंतु त्यांनी मतदान अवश्य करावे”. त्यांच्या या आवाहनाने लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा.
#WATCH | #MaharashtraAssemblyElections2024 | Governor C. P. Radhakrishnan casts his vote at the polling booth at Raj Bhavan in Mumbai, under Colaba Assembly constituency.
Mahayuti has fielded Rahul Narwekar (BJP) from here, he faces a contest from Maha Vikas Aghadi’s Heera… pic.twitter.com/WOxDNPzUCw
— ANI (@ANI) November 20, 2024
कसबा मतदार संघाचे महाविकास आघाडी उमेदवार आमदार रवींद्र धंगेकरांनी मतदानाचा हक्क बजावला. पुण्यातील कोथरुडमधील महेश विद्यालय मतदान केंद्रावर सकाळी 6 वाजताच मॉर्निंग वॉकसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी हजर झाले. मतदान केंद्र सकाळी 7 वाजता खुले होण्यापूर्वीच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांच्या या उत्साहामुळे मतदानाची सुरवात खास ठरली आहे.