यवत : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होत आहे. पुणे जिल्ह्यात २१ विधानसभाकरीता ११ हजार ४२१ बॅलेट युनीट तर प्रत्येकी ८ हजार ४६२ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी साहित्याचे वितरण श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट यात्री निवासस्थान-२ गोळेगाव येथून करण्यात आले. यावेळी प्रत्येकी ३५६ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट वितरित करण्यात आले.
जिल्ह्यातील अन्य मतदार संघातील साहित्य वितरण केंद्रे व वितरीत करण्यात आलेले साहित्य:
- आंबेगाव विधानसभा मतदारसंघ- शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खु.- प्रत्येकी ३४६ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- खेड-आंळदी विधानसभा मतदारसंघ- हुतात्मा शिवराम हरी राजगुरु तालुका क्रीडा संकुल, तिन्हेवाडी- प्रत्येकी ३८९ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- शिरुर विधानसभा मतदारसंघ- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, गोदाम क्र. ३ कारेगाव, रांजणगाव एमआयडीसी- प्रत्येकी ४५७ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट वितरण करण्यात आले.
- दौंड विधानसभा मतदारसंघ- जुने शासकीय धान्य गोदाम, मदर तेरसा चौक, नगर मोरी, दौंड- प्रत्येकी ३१३ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- इंदापूर विधानसभा मतदारसंघ- शासकीय धान्य गोदाम, इंदापूर- ६७४ बॅलेट युनीट आणि प्रत्येकी ३३७ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- बारामती विधानसभा मतदारसंघ- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, एमआयडीसी, बारामती- ७७२ बॅलेट युनीट, प्रत्येकी ३८६ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- पुरंदर विधानसभा मतदारसंघ- नवीन प्रशासकीय इमारत आवार, सासवड- ८३६ बॅलेट युनीट, प्रत्येकी ४१८ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- भोर विधानसभा मतदारसंघ- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोर, जुनी पंचायत समिती सभागृह वेल्हे, जिल्हा परिषद शाळा कुरण खुर्द (पानशेत) व राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारअंबोली, ता. मुळशी- प्रत्येकी ५६४ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- मावळ विधानसभा मतदारसंघ- नुतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, तळेगाव-दाभाडे- प्रत्येकी ४०२ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- चिंचवड विधानसभा मतदारसंघ- स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव- १ हजार १२८ बॅलेट युनीट, प्रत्येकी ५६४ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- पिंपरी विधानसभा मतदारसंघ-ऑटो कल्स्टर अँड रिसर्च सेंटर, चिंचवड – प्रत्येकी ३९८ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
भोसरी विधानसभा मतदारसंघ- ईडब्लूएस टाऊन हॉल सेक्टर नं. १७ आणि १९ घरकुल चिखली- प्रत्येकी ४९२ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट. - वडगावशेरी विधानसभा मतदार संघ- कै. राजाराम भिकु पठारे (स्टेडीयम) खराडी- ८९६ बॅलेट युनीट, प्रत्येकी ४४८ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- शिवाजीनगर मतदार संघ- बॅडमिंटन हॉल, कृषी महाविद्यालय- प्रत्येकी २८० बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- कोथरुड मतदार संघ- एम आय टी विश्वशांती गुरुकुल शाळा, कोथरुड- प्रत्येकी ३८७ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- खडकवासला मतदार संघ- स्प्रिंगडेल स्कूल मैदान वडगाव बु. ता. हवेली- प्रत्येकी ५०७ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- पर्वती मतदार संघ- महाराष्ट्रीयन मंडळ स्पोर्टस ग्राउंड शेठ दगडूराम कटारिया हायस्कुल मुकुंदनगर, पुणे- प्रत्येकी ३४४ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- हडपसर मतदार संघ- रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय हडपसर- १ हजार ६४ बॅलेट युनीट, प्रत्येकी ५३२ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ- अल्पबचत भवन क्विन्स गार्डन- ५४८ बॅलेट युनीट, प्रत्येकी २७४ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट.
- कसबा मतदार संघाचे साहित्य वितरण गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथून करण्यात आले. यावेळी प्रत्येकी २६८ बॅलेट युनीट, कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले.
उमेदवारांची संख्या १६ पेक्षा अधिक असल्यामुळे इंदापूर, बारामती, पुरंदर, चिंचवड, वडगाव शेरी, हडपसर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या ७ विधानसभा मतदारसंघात दोन बॅलेट युनिट तर उर्वरित १४ विधानसभा मतदारसंघात एकच बॅलेट युनिट वापरण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रनिहाय टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. साहित्य घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दर्शनी भागातील फलकाद्वारे माहिती देण्यात आली. साहित्य वितरण केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान कर्मचाऱ्यांना यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. साहित्य ताब्यात घेतल्यानंतर मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.