शिरूर : जुन्नर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची बुधवार (दि.२०) नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात ४६६०४२ मतदार आहेत. यामध्ये २४१७८७ पुरुष मतदार, २२४२३२ महिला मतदार, तर २३ तृतीयपंथी मतदार असून ते मतदानाचा हक्क एकूण ४५७ मतदान केंद्रावर बजावणार आहेत. एकूण मतदारांपैकी शिरूर तालुक्यात २ लाख १३ हजार ४०३ मतदार असून त्यामध्ये १ लाख ८ हजार ७७ पुरुष मतदार, तर १ लाख ५ हजार ३१६ महिला मतदार आणि १० तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. हवेली तालुक्यात २ लाख ५२ हजार ६३९ मतदार असून त्यापैकी १ लाख ३३ हजार ७१० पुरुष मतदार, तर १ लाख १८ हजार ९१६ महिला मतदार आणि १३ तृतीयपंथी मतदार आहेत. शिरूरपेक्षा हवेली तालुक्यात ३९,२३६ मतदार जास्त आहेत.
शिरुर-हवेली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक-३ तथा उपजिल्हाधिकारी संगीता राजापूरकर, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के कामकाज पाहत आहेत. जवळपास तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा निवडणूक कामकाजात सहभाग असणार आहे.
तसेच मतदारांना आपले नाव मतदार यादीमध्ये शोधायचे असल्यास व्होटर हेल्पलाईन अॅपव्दारे मतदार आपले नाव पाहू शकतात. १०० मीटर परिसरात मोबाईल आणण्यास मज्जाव असून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या १२ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदार मतदान करू शकतात तसेच मतदान केंद्रांवर किमान पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान टक्केवारीत कंसात त्यावेळी असणारी एकूण मतदार संख्या..
२००९ : ६४.२८ टक्के (२८५१२९)
२०१४ : ६९.६४ टक्के (३१०४८९)
२०१९ : ६७.३१ टक्के (३८४३२३)
२०२४ ची एकूण मतदार संख्या (४६६०४२)
२०२४ च्या शिरुर हवेली विधानसभा निवडणुकीत वयोमानानुसार सरासरी मतदार टक्केवारीत….
१८ ते २५ : १४ टक्के
२६ ते ३५ : २६ टक्के
३६ ते ५० : ३२ टक्के
५१ ते ६० : १३ टक्के
६० वर्षावरील : १५ टक्के
शिरुर २०२४ विधानसभा निवडणूक लढविणारे उमेदवार व कंसात पक्ष…
- अशोक रावसाहेब पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)
- ऍड. विशाल शंकर सोनवणे (बहुजन समाज पार्टी)
- ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
- चंद्रशेखर ज्ञानेश्वर घाडगे (संभाजी ब्रिगेड पार्टी)
- डफळ तुकाराम नामदेव (सैनिक समाज पार्टी)
- विनोद वसंत चांदगुडे (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी)
- अशोक गणपत पवार (अपक्ष)
- अशोक रामचंद्र पवार (अपक्ष)
- दत्तात्रय बबन काळभोर (अपक्ष)
- नाथाभाऊ शिवराम पाचर्णे (अपक्ष)
- राजेंद्र वाल्मिक कांचन (अपक्ष)