नवी दिल्ली : वाढत्या वयासोबत तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर अंडी यासाठी मदत करू शकतात. अंडी खाल्ल्याने स्मरणशक्ती टिकून राहण्यास मदत होते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी सॅन डिएगोच्या टीमने सांगितले की, अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा अधिक असते. मात्र कॉग्निटिव्ह फंक्शनसाठी असलेले पोषक घटकसुद्धा यातून मिळतात. संशोधकांनी ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ३५७ पुरुष आणि ५३३ महिला अशा एकूण ८९० जणांवर संशोधन केले. अंड्यांमध्ये उच्च दर्जाची प्रथिने, व्हिटॅमिन बी १२, फॉस्फरस आणि सेलेनियमने समृद्ध असतात.