तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भैरवनाथनगर शासनाच्या गायरान गटात शासकीय घरकुल योजनेतून घर मिळालेल्या नागरिकांना १९७३ पासून भौतिक सुखसविधा मिळत नसल्याने येथील नागरिकांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून याबाबत फ्लेक्स या भागात व गावातील मुख्य ठिकाणी लावले आहेत.
तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथ गायरानात १९७३ पासून घरकुल योजनेच्या माध्यमातून लोकवस्ती प्रस्थापित झाली असून ५० वर्षांपासून या भागातील नागरिक मूलभूत सुखसुविधांपासून वचित आहे. मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ता, पाणी, पथदिवे, गटार लाईन अशा अनेक सुविधा अनेक वर्षांपासून मागणी करूनही मिळत नसल्याने नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर लोकसभेला सर्व नागरिकांनी बहिष्कार टाकून निषेध नोंदवला होता. यावेळी येथील ग्रामस्थ मतदानाचा हक्क बजावतील का? याकडे लक्ष लागले आहे.