मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन यांचे वडिल आणि बंगाली अभिनेत्री मुनमुन सेन यांचे पती भारत देव वर्मा यांचे निधन झाले आहे. आज (दि. 19 नोव्हेंबर) कोलकात्यातील राहत्या घरी सकाळी 9 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षाचे होते.
भारत देव वर्मा यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर त्यांनी लिहिलं, ‘मुनमुन सेन यांचे पती आणि माझे हितचिंतक भारत देव वर्मा यांच्या निधनाने मी दु:खी आहे. ते अत्यंत प्रेमळ होते. मी त्यांच्या आठवणी कायम माझ्या मनात जपून ठेवीन. त्यांनी खरोखरच मला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानलं होतं. त्यांच्या निधनाने मी खूप काही गमावलंय. आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मी त्यांच्या बालीगंगे इथल्या निवासस्थानी गेले. तिथे त्यांची मुलगी रिया उपस्थित होती. तर पत्नी मुनमुन आणि दुसरी मुलगी रायमा दिल्लीहून येत आहेत. त्यांनी मी श्रद्धांजली अर्पित करते आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करते.’
भरत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील होते. भारत यांनी अभिनेत्री मुनमुन सेन यांच्याशी लग्न केलं. त्यांना रायमा आणि रिया या दोघी मुलगी असून दोघीही अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत. पतीच्या या जगातून अचानक जाण्याने मुनमुन सेनवर दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अभिनेत्री रायमा सेन कोलकात्याला रवाना झाली आहे. जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा ती जयपूरमध्ये शूटिंग करत होती.
Saddened by the demise of Bharat Dev Varma, the husband of filmstar Moon Moon Sen, and himself a great well-wisher of mine.
He was indeed very loving and affectionate to me and I shall always treasure his memories. He truly considered me as part of his family and his demise is…
— Mamata Banerjee (@MamataOfficial) November 19, 2024