मुंबई : विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. दरम्यान, विनोत तावडेंनी यादरम्यान 25 वेळा आपल्याला फोन करून माफी मागितल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. विरार पूर्वेला मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये हा राडा झाला. वसई-विराराचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या सर्व राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हितेंद्र ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “विनोद तावडे यांनी मला 25 वेळा फोन करुन माफी मागितली. प्रकरण जास्त ताणू नका, असे तावडेंनी सांगितल्याचे ठाकूर यांनी म्हटले. त्याप्रमाणे मला सोडवा,. मला माफ कर, जाऊ द्या.. मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
“विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस लाज-शरम कोळून प्याले आहेत. 48 तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो, हे साधं माहित नाही आणि हे राज्याचे शिक्षण मंत्री होते” अशी टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली.