नवी दिल्ली : सध्याच्या युगात बँकांमध्ये पैसे गुंतवणूक करण्यापेक्षा शेअर मार्केटमध्ये किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिलं जातं. पण, आता जर तुमच्याकडे पैसे आहेत आणि ते तुम्हाला गुंतवण्याची इच्छा असेल तर पोस्ट ऑफिसची अशी एक योजना आहे. त्याने तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात.
पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक अगदी सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. त्यात ‘किसान विकास पत्र’ किंवा KVP ही योजना चांगलीच फायद्याची दिसत आहे. ज्यातील विशेष गोष्ट म्हणजे ती केवळ 115 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करते. तुम्हालाही कोणतीही जोखीम न घेता अधिक पैसे कमवायचे असतील, तर पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (KVP) ची ही लोकप्रिय योजना ठरू शकते.
विशेषत: अधिक नफा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास 115 महिन्यांत पैसे दुप्पट होतात (दुहेरी उत्पन्न योजना). तुम्ही 100 च्या पटीत किमान 1000 रुपये गुंतवू शकता. विशेष म्हणजे यामध्ये कमाल मर्यादा नाही. तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही गुंतवू शकता.
योजनेत किती खाती येतील उघडता?
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एकल आणि दुहेरी दोन्ही खाती उघडता येतात. या सरकारी योजनेत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावावरही खाते उघडता येते. याच्या मदतीने एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. यालाही मर्यादा नाही.