पुणे : मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 84 हजारांपर्यंत पगार मिळवता येणार असून, यासाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारीची निवड केली जाणार आहे. संबंधित उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही 26 नोव्हेंबर 2024 रोजी घेतली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, मेकॅनिकल डिप्लोमा.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 30,000/- ते रु. 84,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 26 नोव्हेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : एच.आर.डी. विभाग, आउटसोर्सिंग सेल, 4था मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. अर्नेस्ट बोर्जेस रोड, परळ, मुंबई – 400 012.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://tmc.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.