पुणे : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवणामध्ये अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वंदे भारत येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला तिरुनेलवेली आणि चेन्नई दरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये सांबरात कीटक आढळले आहे. मात्र, जेवणात किडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षितेतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
वंदे भारत ट्रेनमधील प्रवासादरम्यान एका प्रवाशाला त्याला मिळालेल्या जेवणातील सांभारात एक किडा तरंगत असल्याचं दिसत आहे. तिरुनेलवेलीहून चेन्नईला जाणाऱ्या वंदे भारतच्या इतर अनेक प्रवाशांनीही ट्रेनमधील सुविधा चांगल्या असल्या तरी जेवण समाधानकारक नसल्याची तक्रार केली आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी मुरुगन नावाच्या प्रवाशाने फूड प्रोव्हायडरला फोन केला होता. मुरुगनने सांगितले की, अन्नदात्याने आपल्या हाताने दोन जंत काढले तर मुरुगनने हाताने उरलेले अळी काढले.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, अन्न पुरवठादाराने कीटक नसून जिरे असल्याचे सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. या स्पष्टीकरणाने हताश झालेल्या मुरुगन यांनी तक्रार पुढे नेली. त्याने कॅमेऱ्यात संभाषण रेकॉर्ड केले आणि जेवण परत केले. आजूबाजूला उपस्थित असलेल्या प्रवाशांनीही जेवण परत केले.
रेल्वेने घेतली तक्रारीची दखल…
या तक्रारीला रेल्वेनेही प्रतिसाद दिला आहे. रेल्वेच्या वतीने या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात आली आहे. डिंडीगुल स्थानकातील तपासकर्त्याकडे फूड पॅकेज सुपूर्द करण्यात आले. अन्नाच्या पाकिटाला किडा चिकटल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गाडीत जेवण देणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरला रेल्वेने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जेवणाचा दर्जा आणि प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रेल्वे कटिबद्ध असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे.
Dear @AshwiniVaishnaw ji ,live insects 🦟 were found in the food served on the Tirunelveli-Chennai #VandeBharatExpress
Passengers have raised concerns over hygiene and IRCTC’s accountability.
What steps are being taken to address this and ensure food safety on premium trains? pic.twitter.com/auR2bqtmip— Manickam Tagore .B🇮🇳மாணிக்கம் தாகூர்.ப (@manickamtagore) November 16, 2024