मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता फक्त काही तास बाकी आहेत. सोमवारी निवडणुकीच्या प्रचार मोहिमांच्या तोफा थंडावल्या आहेत. गेल्या 20 दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या सभा, बैठका, रॅली, रोड शो आणि आरोप-प्रत्यारोपांसह दावे प्रतिदाव्यांमुळे राजकीय धुरळा उडाला होता. काल संध्याकाळी सहा वाजता प्रचाराची मुदत संपल्याने हा धुरळा शांत झाला आहे. अशातच शरद पवार यांच्या सभांची चर्चा रंगली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी बारामतीमध्ये सांगता सभा घेऊन आपापल्या प्रचार मोहिमांचा शेवट केला.
विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारा दरम्यान शरद पवार यांनी स्वत:ला केंद्रस्थानी ठेवण्यात चांगलंच यश मिळवले आहे. इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा शरद पवार यांची बरीच भाषणं ही चर्चेचा विषय राहिली आहेत. 84 वर्षांचे शरद पवार यांनी राज्यभरात फिरुन राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून काढले. ‘गद्दारांना साधसुधं नाही, तर जोरात पाडा, महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे’, असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना निक्षून सांगितले. राज्यातील अन्य नेत्यांच्या तुलनेत शरद पवार यांनी घेतलेल्या सभा चर्चेचा विषय ठरला आहे. शरद पवार यांनी 1 नोव्हेंबरला प्रचार मोहीमेचा शुभारंभ केला होता. या मोहीमेची 18 नोव्हेंबरला म्हणजे काल सोमवारी सांगता झाली. या काळात शरद पवार यांनी तब्बल 69 जाहीर सभा आणि 3 पत्रकार परिषदा घेतल्या आहेत.या सर्वांचा शरद पवार गटाला किती फायदा होणार? हे मात्र येणार्या 23 तारखेलाच समजू शकणार आहे.
शरद पवारांचा महाराष्ट्रातील दौरा खालील प्रमाणे..
०१-११-२४ – बारामती निवासस्थान कार्यकर्ता संवाद मेळावा
०२-११-२४ – पत्रकार परिषद, बारामती
३-११-२४ – पडस्थळ इंदापूर कार्यकर्ता मेळावा
०४-११-२४ – पत्रकार परिषद, मुंबई
०५-११-२४ – दिवाळी निमित्त गावभेट दौरा चौधरवाडी सभा, बारामती
०५-११-२४ – जाहीर सभा शिर्सुफळ , बारामती
०५-११-२४ – जाहीर सभा सुपा, बारामती
०५-११-२४ – जाहीर सभा मोरगाव, बारामती
०५-११-२४ – जाहीर सभा, सोमेश्वर, बारामती
०५-११-२४ – पक्ष प्रवेश सोहळा, बारामती
०५-११-२४ – व्यापारी मेळावा, बारामती
०५-११-२४ – वकील संघटना मेळावा, बारामती
०६-११-२४ – महाविकास आघाडी जाहीर, सभा मुंबई
०७-११-२४ – जाहीर सभा, नागपूर पूर्व
०७-११-२४ – जाहीर सभा, तिरोडा, गोंदिया
०७-११-२४ – जाहीर सभा, काटोल, नागपूर
०८-११-२४ – जाहीर सभा, हिंगणघाट, वर्धा
०८-११-२४ – जाहीर सभा, जिंतूर, परभणी
०८-११-२४ – जाहीर सभा, वसमत, हिंगोली
०९-११-२४ – जाहीर सभा, उदगीर, लातूर
०९-११-२४ – जाहीर सभा, परळी, बीड
०९-११-२४ – जाहीर सभा, आष्टी, बीड
०९-११-२४ – जाहीर सभा, बीड
१०-११-२४ – जाहीर सभा, भूम-परंडा, धाराशिव
१०-११-२४ – जाहीर सभा, शेवगाव, अहिल्यानगर
१०-११-२४ – जाहीर सभा, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर
१०-११-२४ – जाहीर सभा, घणसांगवी, जालना
११-११-२४ – जाहीर सभा, पारोळा, जळगाव
११-११-२४ – जाहीर सभा, सिंदखेडा, धुळे
११-११-२४- जाहीर सभा, जामनेर, जळगाव
११-११-२४ – जाहीर सभा, मुक्ताईनगर, जळगाव
११-११-२४ – जाहीर सभा, धरणगाव, जळगाव
१२-११-२४ – पत्रकार परिषद, जळगाव
१२-११-२४ – जाहीर सभा, कळवण, नाशिक
१२-११-२४ – जाहीर सभा, दिंडोरी, नाशिक
१२-११-२४ – जाहीर सभा, निफाड, नाशिक
१२-११-२४ – जाहीर सभा, येवला, नाशिक
१२-११-२४ – जाहीर सभा, कोपरगाव, अहमदनगर
१२-११-२४ – जाहीर सभा, आडगाव, नाशिक
१३-११-२४ – जाहीर सभा, सिन्नर, नाशिक
१३-११-२४ – जाहीर सभा, राहाता, अहमदनगर
१३-११-२४ – जाहीर सभा, राहुरी, अहमदनगर
१३-११-२४ – जाहीर सभा, ओतूर, जुन्नर, पुणे
१३-११-२४ – जाहीर सभा, मंचर, आंबेगाव, पुणे
१३-११-२४ – जाहीर सभा, खेड, पुणे
१३-११-२४ – जाहीर सभा, भोसरी, पुणे
१४-११-२४ – चिंचवड रॅली, जाहीर सभा
१४-११-२४ – जाहीर सभा, शिरूर, पुणे
१४-११-२४ – जाहीर सभा, धनकवडी, पुणे
१४-११-२४ – जाहीर सभा, वानवडी, पुणे
१४-११-२४ – जाहीर सभा, हडपसर, पुणे
१५-११-२४ – जाहीर सभा, तासगाव, सांगली
१५-११-२५ – जाहीर सभा, इचलकरंजी, कोल्हापूर
१५-११-२४ – जाहीर सभा, चंदगड,, कोल्हापूर
१५-११-२४ – जाहीर सभा, गडहिंग्लज, कोल्हापूर
१५-११-२४ – जाहीर सभा, कराड उत्तर
१६-११-२४ – पत्रकार परिषद, सातारा
१६-११-२४ – जाहीर सभा, रायगड
१६-११-२४ – जाहीर सभा, वाई, सातारा
१६-११-२४ – जाहीर सभा, कोरेगाव, सातारा
१६-११-२४ – जाहीर सभा, माण, सातारा
१६-११-२४ – जाहीर सभा, फलटण, सातारा
१७-११-२४ – जाहीर सभा, करमाळा, सोलापूर
१७-११-२४ – जाहीर सभा, माढा, सोलापूर
१७-११-२४ – जाहीर सभा, पुरंदर, पुणे
१७-११-२४ – जाहीर सभा, इंदापूर, पुणे
१७-११-२४ – जाहीर सभा, दौंड, पुणे
१८-११-२४ – जाहीर सभा, भोर, पुणे
१८-११-२४- जाहीर सभा, कर्जत, अहिल्यानगर
१८-११-२४ – जाहीर सभा, इंदापूर, पुणे
१८-११-२४ – जाहीर सभा, बारामती, पुणे
69- जाहीर सभा/मेळावे, 3 – पत्रकार परिषद