नवी दिल्ली : सध्या अनेक कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रॉडक्ट्स आणले जात आहेत. त्यात Apple या कंपनीच्या ब्रँडची चांगलीच चर्चा असते. असे असताना Apple आता पूर्णपणे Type-C पोर्टवर शिफ्ट झाले आहे. Apple च्या iPhone 15 सीरिजमध्ये टाईप-सी पोर्टही आणणार आहे.
आता Apple आपले 3.5mm जॅक अडॅप्टर बंद करण्याच्या तयारीत आहे. कारण, सध्या Apple चे सर्व प्रॉडक्ट्समध्ये टाईप-सी पोर्ट मिळत आहे. लाईटनिंग पोर्ट असलेल्या सर्व iPhones आणि Apple उत्पादनांसाठी 3.5mm हेडफोन जॅक जोडण्यासाठी 3.5mm जॅक अडॅप्टर लाँच करण्यात आला होता. पण, आता Apple च्या स्टोअरमधून 3.5mm जॅक अडॅप्टर काढून टाकण्यात आले आहेत.
इतकेच नाहीतर Apple India च्या वेबसाईटवर ते Sold Out ही दाखवले जात आहे. 3.5mm हेडफोन जॅक इतर ई-कॉमर्स साईटवरही उपलब्ध नाही. Apple ने 2016 मध्ये iPhone 7 सह 3.5mm हेडफोन जॅक लाँच केला होता. त्यानंतर ते iPhone 7, iPhone 8 आणि iPhone X मॉडेलच्या बॉक्समध्येही येऊ लागले. मात्र, आता तुम्हाला 3.5mm जॅक अडॅप्टर मिळणार नसल्याचे समोर आले आहे.