पुणे : राज्यपाल कोश्यारी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्यपालांचा ताफा रस्त्यावरुन जात असताना राष्ट्रावादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांचा निषेध म्हणून त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यासाठी त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे.
यासाठी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यपालांना काळे झेंडे दाखवू, असा इशाराही राष्ट्रवादीने दिला होता. त्यानुसार त्यांनी हे आंदोलन केले आहे.