अमरावती : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. राज्यातील सर्वच पक्ष आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी प्रचार सभा, बैठकांचे आयोजन करत आहे. अशाच एका प्रचार सभेत राडा झाल्याचे समोर येत आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावात नवनीत राणा यांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा झाला आहे. काही लोकांनी माजी खासदार नवनीत राना यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचं समोर आलं आहे. रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा आल्या होत्या, त्यावेळी जमावाने घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यामध्ये खुर्च्या फेकल्या. दोन गटामध्ये हाणामारी, धक्काबुक्की आणि राडा झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नवनीत राणा दर्यापूर मतदारसंघात प्रचारासाठी आल्या होत्या. खल्लार या गावात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी नवनीन राणा यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी दोन गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना पाचरण करण्यात आले. पोलिसांनी हे प्रकरण शांत करण्यात यश आलं आहे. पण यामध्ये अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. खुर्च्या फेकून मारल्या. तोडफोड करण्यात आली. दोन गटात जोरदार घोषणाबाजी आणि मारमारी झाल्याचं समोर आले आहे. खल्लार गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
दोन गटात राडा..
नवनीत राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारानंतर नवनीत राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसांत धाव घेतली. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांना दाखवत नवनीत राणा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
नेमकं काय झालं?
अमरावतीमधील दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मोठा गोंधळ झाला. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात काही जणांनी नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या फेकल्याने गोंधळ उडाला आहे. या घटनेत नवनीत राणा थोडक्यात बचावल्याची माहिती मिळत आहे. राड्यानंतर नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस ठाणे गाठले. या घटनेने रॅलीतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.