श्रीगोंदा : राज्याच्या बड्या नेत्याला गावात बोलवून सभा घेतली. पण या सभेत गावात एखादे विकास काम केल्याचे का सांगितले नाही, स्वताच्या गावाचा विकास करता येईना हे निघाले आमदार बनायला, अशी घणाघाती टीका भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी केली. भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या प्रचारार्थ वांगदरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती.
पुढे बोलताना नागवडे म्हणाले, ज्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावात विकास करावा वाटला नाही, उलट आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून विक्रम पाचपुते यांनी देवीच्या मंदिर परिसरासाठी ४० लाखांचा निधी दिला होता. तो निधी मागे लावण्याचे काम त्यांनी केले. आता फक्त आमदार होण्यासाठी आदरणीय शिवाजीराव नागवडे यांच्या बाबतीत सांगतात. पण बापूंना कोणी किती जीव लावला याचा साक्षीदार मी आहे.
राज्यातील वाचाळवीर नेता गावात आणला, पण विकासाचे काहीच धोरण न सांगता फक्त आमदार बबनराव पाचपुते कुटुंबावर टीका करण्याचा उद्योग केला. उमेदवार म्हणून तुम्ही काय करणार हे का सांगत नाहीत, व्यक्तिगत पातळीवर टीका करुन कोणी आमदार होत नसते. यांचे एकच व्हीजन समाजात वाद लावून स्वताची पोळी भाजून घेणे, अशा शब्दांत अनुराधा नागवडे यांचे नाव न घेत टीका केली.