आपल्या शरीरात Vitamin D, Vitamin C यांसारख्या सर्वच पोषकघटकांची गरज असते. ते आपल्या नैसर्गिक पदार्थांमधून अगदी सहजरित्या मिळवता येऊ शकतात. त्यात Vitamin C हे शरीरासाठी आवश्यक जरी असलं तरी त्याचं प्रमाण हे योग्यच असावं असा सल्ला दिला जातो. नाहीतर काही गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
Vitamin C च्या अतिरिक्त सेवनाने शरीरावर काही दुष्परिणाम दिसू लागतात. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेण्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे पचनक्रियेमध्ये होणार बदल. यामुळे तुम्हाला अपचन, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ अशा समस्या होऊ लागतात. व्हिटॅमिन सी सप्लीमेंट बंद करून तुम्ही या समस्यांपासून आराम मिळवू शकता. याशिवाय, शरीरात Vitamin C चे प्रमाण जास्त असल्यास हाडांचा असामान्य विकास होऊ शकतो. त्यामुळे दुखणे, अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसू लागतात.
जास्त प्रमाणात Vitamin C अन्न किंवा पूरक आहार घेतल्यास किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. कारण, शरीर ऑक्सलेटच्या रूपात अतिरिक्त Vitamin C मूत्राद्वारे बाहेर टाकते. परंतु, काहीवेळा ते इतर खनिजांसह एकत्रित होते आणि लहान क्रिस्टल्सचे रूप धारण करते आणि मूत्रपिंडात दगड अर्थात स्टोन बनतो. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.