पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रथम व द्वितीय निवडणूक खर्च तपासणीवेळी निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या एका उमेदवाराला नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी ही माहिती दिली. चिंचवड विधानसभेत उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर, तर दुसरी तपासणी १३ नोव्हेंबरला झाली.
या दोन्ही खर्च तपासणीवेळी विनायक सोपान ओव्हाळ या उमेदवाराने खर्चाचा दैनंदिन हिशोब सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत खुलासा न केल्यास उमेदवाराविरोधात कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.