मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सूर असून प्रचाराने चांगला रंग पकडला आहे. प्रत्येक पक्षातील मोठ्या नेत्यांकडून आपापल्या परीनं मतदारांना आश्वासनं दिली जात आहेत. अशातच जाहीर सभांमध्ये बोलताना अनेक विविध घोषणा केल्या जात आहेत. तर, विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असाच एक मुद्दा महायुतीकडून यंदाच्या प्रचारात पुढे करण्यात आला आहे, तो म्हणजे ‘व्होट जिहाद’चा. खडकवासलामधल्या सभेत फडणवीस यांनी नोमानींची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. अशातच आता फडणवीसांनी केलेलं ट्वीट खूप चर्चेत आलं आहे. आज सकाळी साडेदहा वाजता झोपलेल्यांना जागे करण्याचं आवाहन, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलं आहे.
किरीट सोमय्यांचे सज्जाद नोमानींविरोधात निवडणूक आयोगाला पत्र..
भाजप नेते किरीट सोमय्यांनी सज्जाद नोमानींचा एक व्हिडीओ समोर आणला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बॉयकॉट करा, असं आवाहन या व्हिडीओद्वारे नोमानी करत असल्याचं व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. याच व्हिडीओवरुन किरीट सोमय्यांनी मौलाना सज्जाद नोमानींवर व्होट जिहादचा आरोप करून यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्रही लिहिलं आहे. तसेच, या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे मौलाना सज्जाद नोमानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
यही समय है, सही समय है।
सोए हुओं को जगाने का…उद्या सकाळी 10.30 वा.#MaharashtraElection2024 pic.twitter.com/BGzNDLlaB6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2024
फडणवीसांचं ट्वीट नेमकं काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुस्लीम स्कॉलर सज्जाद नोमांनीच्या कथित क्लिपवरुन खूप आक्रमक झालेले दिसून येत आहेत. फडणवीसांनी रात्री दहाच्या सुमारास एक्सवर पोस्ट करत आज सकाळी साडेदहा वाजता झोपलेल्यांना जागे करण्याचं आवाहन केलं आहे. ‘यही समय है, सही समय है, सोए हुओं को जगाने का’, असं म्हणत फडणवीसांनी ट्वीट केलं आहे. आज सकाळी साजेदहा वाजता ते नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करणार? झोपलेल्यांची झोप कशी उडवणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.