दररोज दातांना ब्रश केल्याने दातांमध्ये फ्रेशनेस निर्माण होते. जर त्याकडे दुर्लक्ष केल्यास काही समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे दातांच्या आरोग्याकडे काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यात काहींचे असेही दात असतात ते कितीही ब्रश केले तरी दातांमध्ये असणारा पिवळेपणा जात नाही. पण, दातांमधील हा पिवळपणे आता दूर करता येणार आहे. तेही घरगुती उपायांनी.
बेकिंग सोडा आणि लिंबू हा एक पर्याय ठरू शकतो. ते वापरण्यासाठी 1/2 चमचे बेकिंग सोडामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. आता ते टूथब्रशवर लावा आणि दातांवर हलक्या हाताने चोळा. दोन मिनिटांनी स्वच्छ धुवा. तुम्ही ते रोज वापरू शकता. त्याने काही प्रमाणात परिणाम दिसून येऊ शकतो. तसेच हळद आणि खोबरेल तेलाचे मिश्रण हा देखील एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. त्यासाठी, सर्वप्रथम 1 चिमूट हळदीमध्ये 1 चमचे खोबरेल तेल मिसळा. आता ही पेस्ट ब्रशच्या मदतीने दातांवर लावा. दोन मिनिटांनी स्वच्छ धुवा. यामुळे दातांचा पिवळेपणाही कमी होतो आणि तोंडातील बॅक्टेरियाही नाहीसा होतो.
सफरचंद सायडर व्हिनेगर याचा वापर केल्यास फायद्याचे ठरू शकते. हे वापरण्यास देखील अगदी सोपे आहे. ते वापरण्यासाठी, प्रथम 1 चमचे सफरचंद व्हिनेगर पाण्यात मिसळा. दिवसातून एकदा याने स्वच्छ धुवा. याने दातांवरील डाग आणि पिवळेपणाही दूर होऊ शकतो.