पुणे : केसमध्ये मदत करण्यासाठी दीड लाखांची लाच स्वीकारण्याप्रकरणी जिल्हा न्यायालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन अशोक देठे (वय ३९, राजगुरूनगर, खेड) असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतनार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदारांच्या मावस भावाचे प्रकरण सध्या शिवाजीनगर जिल्हा नायायालयात सुरु होते. त्याठिकाणी आरोपी देठे हा लिपिक म्हणून कार्यरत होता. या प्रकरणात मदत करण्यासाठी देठे यांच्याकडून तब्बल दोन लाखांची मागणी करण्यात आली.
यामागणी नंतर दीड लाख रुपयांवर तडजोड करण्यात आली. शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर असणाऱ्या गणेश झेरॉक्सच्या समोर देठे याला दीड लाख रुपये स्वीकारताना रात्री सव्वा आठच्या सुमारास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले.