लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी ०२ वर्षासाठी पुणे शहर तथा जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
गणेश शिवाजी चौधरी (वय- २४ रा. मराठी शाळेजवळ, वायकर वस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली) अजय शाम विश्वकर्मा वय-२० रा. नवीन कॅनॉल रोड, म्हातोबाची आळंदी रोड, कुंजीरवाडी, ता. हवेली) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांची नावे आहेत. परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन ०२ वर्षाकरीता तडीपार केले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी व आळंदी म्हातोबाची परिसरातील वारंवार गुन्हे करीत होते. त्यामुळे नागरिकामध्ये दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करीत होते. सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये.
सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांना प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार सदर सराइतांना पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातुन दोन वर्षा करीता तडीपार करण्याचा आदेश पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी पारित केला आहे.
सदरची कारवाई परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चौगुले, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे यांनी केली आहे.