सागर जगदाळे
भिगवण : पुणे- सोलापूर महामार्गावरील मदनवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत चोरून गोमांसची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पलटी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ०२) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पुणे – सोलापूर महामार्गावरून सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने एक गोमांस घेऊन एक पिकअप सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चोरून भरधाव निघाले होते.
मदनवाडी ग्रामपंचायत हद्दीतील व्यंकटेश लॉन्स या समोर आल्यानंतर पिकअप वरील चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप महामार्गाच्या दुभाजकाला धडकले. त्यामुळे सदर पिकअप महामार्गावर पलटी झाले.
दरम्यान, चोरून चालविलेले गोमांस हे महामार्गावरच पडल्याने गोमांसाची छुप्या पद्धतीने होणारी वाहतूक उघडकीस आली आहे. रस्त्यावर सगळीकडे गोमांस पडल्याने यातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत होत असून महामार्गावर दुर्गंधी पसरली आहे.