भारतात दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो तो उत्सव म्हणजे कुंभ मेळा. हा महाकुंभ मेळा हिंदू धर्मातील महत्त्वाचा धार्मिक सण आहे. याला कुंभमेळा असेही म्हणतात. भारतातील चार पवित्र नद्या आणि चार तीर्थक्षेत्रांवरच हा उत्सव आयोजित केला जातो. महाकुंभाचे आयोजन देशातील फक्त चारच ठिकाणी केले जाते. त्यात प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि महाराष्ट्रातील नाशिक यांचा समावेश आहे.
कुंभमेळा उत्सवात कोट्यवधी भाविक पवित्र नदीत श्रद्धेने स्नान करतात. या पवित्र स्नानाने पापे नष्ट होतात आणि तो मोक्षाकडे जातो, असे म्हटले जाते. त्यामुळे या मेळ्याला चांगली गर्दी देखील असते. तब्बल 12 वर्षांनंतर महाकुंभाचे आयोजन केले जाणार आहे. आत्तापर्यंत कुंभमेळा हरिद्वारमधील गंगा नदीवर, उज्जैनमधील शिप्रा, नाशिकमधील गोदावरी आणि प्रयागराजमधील संगम (गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वतीचा संगम) नदीवर आयोजित करण्यात आला आहे.
पुढील वर्षी अर्थात 2025 मध्ये उत्तर प्रदेशात कुंभमेळाचे आयोजन केले जाणार आहे. संगम शहर प्रयागराज येथे कुंभमेळा होणार आहे. प्रयागराजमध्ये दरवर्षी माघ मेळा आयोजित केला जात असला तरी अर्धकुंभ आणि महाकुंभमेळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. याआधी 2013 मध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आता या ठिकाणी कुंभमेळा होत आहे.