अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी (यवतमाळ) : आर्णी – केळापुर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शेतकर-यांच्या सोयाबीन, कापूस या शेतमालांचे पडलेले भाव यावर महायुती सरकारवर सडकून टिका केली.
ते म्हणाले, वणी येथे कुणबी समाजाबद्दल भाजपचे नेते साळी या व्यक्तीने अश्लिल शिवीगाळ केली होती. त्याबद्दल भाजपने त्या व्यक्तीवर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे ते अशा लोकांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्यामुळे भाजपला धडा शिकविण्यासाठी खंबीर रहा, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
या वेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार (उद्धव बाळासाहेब ठाकरे), विदर्भ जन आंदोलन समितीचे किशोर तिवारी, राष्ट्रवादीचे माजी आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रविण देशमुख, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बल्लु पाटील लोणकर आदीं उपस्थित होते.