अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिक्रापूर येथील पाटवस्ती बांदल कॉम्ल्पलेक्स समोर असलेल्या साईकृपा मोबाईल खरेदी विक्री दुरुस्तीचे दुकाना रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्याने फोडून काऊंटरमधील डेल कंपनीचा लॅपटॉप, 3 जुने मोबाईल, 2 स्मार्टवांच व 2 पावर बैंक तसेच गल्ल्यातील रोख रक्कम 25 हजार रुपयांचा असा मुद्देमाल मिळुन न आल्याने अज्ञात चोरट्याविरोधात अमित रामावतार चौधरी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि.11 रोजी संध्याकाळी 09.30 वाजण्याच्या सुमारास साईकृपा मोबाईल दुकान बंद करुन घरी गेले असता मंगळवार दि. 12 रोजी सकाळी 09.00 वा. दुकानात आल्यानंतर दुकानातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले व दुकानातील काऊंटरची काच फोडून काऊंटरचे मागे असलेले प्लायवुड तोडत त्याच्या मागे असलेला पत्रा उचकटून काऊंटरमधील डेल कंपनीचा लॅपटॉप, 3 जुने मोबाईल, 2 स्मार्टवांच व 2 पावर बैंक तसेच गल्ल्यातील रोख रक्कम 25 हजार रुपये चोरीला गेले आहेत.
दुकानातील एकुण 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला असून या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. कर्पे हे करत आहेत.