पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीदरम्यान १५ ऑक्टोबरपासून ३१ कोटी ७७ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. यामध्ये १० कोटी ९२ लाख २५ हजार रुपये रोकड, ५ कोटी २ लाख ५७ हजार रुपयांचे ६ लाख ५ हजार लिटर मद्य, ५८ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे अंमलीपदार्थ, ८ कोटी ६३ लाख ५३ हजार रुपयांचे मौल्यवान धातू, ६ कोटी ५९ लाख ८८ हजारांच्या वस्तूंचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित असून संशयास्पद वाहने, वाहतूक आदीवर काटेकोर लक्ष ठेवून कार्यवाही केली जात आहे. पोलिस, आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग आदी विभागांच्या वतीनेही यामध्ये कार्यवाही केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेली कारवाई
- आंबेगाव – १ लाख १७ हजार रुपये रोकड, ३ लाख ९१ हजार रुपयांचे ५ हजार ५५८ लिटर मद्य, ८५ हजार रुपयांच्या वस्तू असा एकूण ५ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त
- बारामती – ६ लाख ८३ हजार रुपयांचे १२ हजार १६ लिटर मद्य, २ लाख ३ हजार किंमतीच्या वस्तू असा ८ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त
- भोर – ६० लाख रुपयांचे २५ हजार ४८७ लिटर मद्य, ८१ हजार रुपयांचे अंमलीपदार्थ, १ कोटी ३५ लाख २९ हजार रुपयांच्या वस्तू असा एकूण १ कोटी ९६ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल
- इंदापूर – ५ लाख २५ हजार रुपये रोकड, १९ लाख ३ हजार रुपयांचे १७ हजार १४ लिटर मद्य, १० लाख ९८ हजार रुपयांच्या वस्तू असा ३५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल
- जुन्नर – २८ लाख ७८ हजार रुपयांचे १३ हजार ९५० लिटर मद्य, ५ लाख ९३ हजार रुपयांचे अंमली पदार्थ, ६१ लाख २७ हजार रुपयांच्या वस्तू असा ९५ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल
- खेड आळंदी – ८९ लाख ८ हजार रुपये रोकड, ३६ लाख ६४ हजार रुपयांचे ४४ हजार ६८५ लिटर मद्य, १० लाख ७९ हजार रुपयांचे अंमली पदार्थ, १४ लाख १६ हजार रुपयांच्या वस्तू असा १ कोटी ५० लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त
- पुरंदर – ५८ लाख ८७ हजार रुपयांचे ८९ हजार ९७२ लिटर मद्य २९ हजार रुपयांचे अंमली पदार्थ, र लाख ५० हजार रुपयांच्या वस्तू असा ६१ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त
- शिरूर – ३ कोटी १ लाख ९० हजार रुपये रोकड, ५२ लाख ६० हजार रुपयांचे ९२ हजार ३१२ लिटर मद्य, १२ हजार रुपयांचे अंमली पदार्थ, १ कोटी ४ लाख ५६ हजारांचे मौल्यवान धातू, ५ लाख ११ हजार रुपयांच्या वस्तू असा ४ कोटी ६४ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.