मुंबई : वाढलेले क्रय उत्पन्न, आर्थिक वाढीला मिळालेली गती यांमुळे गृहनिर्माण गुंतवणूक एक आकर्षक पर्याय बनत चालला आहे. याचा अर्थ लोक घर खरेदीचे निर्णय पूर्वर्वीपेक्षा लवकर घेत आहेत. गृहप्रेमींचे पसंतीचे घर प्रत्यक्षात स्वतःचे होण्याचा म्हणजे मालमत्ता खरेदी करण्याची सरासरी वेळ केवळ २६ दिवसांवर आली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत हा कल दिसून आला आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या ३३ दिवसांच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे एनरॉक समूहाच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
या अहवालामध्ये म्हटल्याप्रमाणे पहिल्या सहामाहीत तीन कोटी आणि त्यापेक्षा जास्त किमतींच्या अल्ट्रा-लक्झरी पसंतीच्या घरांच्या प्रत्यक्ष मालमत्ता खरेदी व्यवहारामध्ये रूपांतर होण्यासाठी केवळ १५ दिवस लागले. आधीच्या आर्थिक वर्षात हा कालावधी २२ दिवसांचा होता. ५० लाख आणि १ कोटी रुपयाच्या दरम्यानच्या घरांच्या खरेदीदारांना जास्तीत जास्त ३० दिवसांचा वेळ लागला, तर १ कोटी ते ३ आर्थिकदृष्ट्या त्वरित निर्णय अल्ट्रा-लक्झरी घरांचे खरेदीदार घेण्यास सक्षम असतात, तसेच, हाय-एंड घरांना सध्या सर्वाधिक मागणी आहे आणि इन्व्हेंटरी लवकर विकली जाते. आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या सहामाहीत परवडणारी घरे मालकीची होण्यासाठीचा कालावधी किरकोळ कमी झाला असून, तो गेल्या आर्थिक वर्षातील २७ दिवसांवरून या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत २६ दिवसांवर आला आहे.
कोटींच्या दरम्यानच्या घरांसाठी प्रत्यक्ष व्यवहार होण्यासाठी २७ दिवसांचा वेळ लागला. विशेष म्हणजे पसंतीचे घर बघितल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष खरेदीमध्ये रूपांतर होण्याचा कालावधी आर्थिक वर्ष २०१९ आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सगळ्यात कमी म्हणजे २५ दिवसांचा होता. खरेदीदारांना आजच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२१ मध्ये घरे बूक करण्यासाठी जास्त वेळ लागला. यावरून सध्याच्या बांधकाम उद्योगातील मोठ्या मागणीचे प्रतिबिंब दिसते. गेल्या काही वर्षामध्ये ब्रँडेड विकासकांकडून नवीन पुरवठ्यात वाढ झाली आहे, त्यामुळे या विकासकांवर त्यांचा विश्वास जास्त असल्याने खरेदीदारांना लवकर निर्णय घेता येतो, असे एनरॉक समूहाचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.