पुणे : राज्यात महायुतीसाठी भाजप आणि वरिष्ठ नेत्यांचा प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील चांगलीच कंबर कसली आहे. एकीकडे अमित शहा यांनी राज्यातील काही भागात सभांचा घडाका लावला आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्याकडून सभा घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नरेंद्र मोडी म्हणाले कि, राहुल गांधी यांच्या तोंडून वीर सावरकर, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी. काँग्रेसला केवळ सत्ता हवी त्याकरीता त्यांनी तुष्टीकरण खेळ खेळला आणि तेच काँग्रेस दलीत, आदिवासी, मागासवर्गीय यांना तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी टीका नरेंद्र मोडी यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची अनेक वर्ष मागणी झाली, पण काँग्रेसने कधी त्याची पूर्तता केली नाही. आम्ही हे काम करून आमची जबाबदारी पार पाडली आहे. विदेशी गुलामगिरी मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला आहे. वीर सावरकर यांना सतत ते शिव्या देतात. आघाडीला मी आव्हान देतो की, राहुल गांधी यांच्याकडून वीर सावरकर, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी. काँग्रेस ला केवळ सत्ता हवी त्याकरीता त्यांनी तुष्टीकरण खेळ खेळला आणि तेच काँग्रेस दलीत, आदिवासी, मागासवर्गीय यांना तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं मोदी म्हणाले.
हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे : नरेंद्र मोदी
पुढे म्हणाले, ओबीसी, एससी, एसटी यांच्यात वाद निर्माण करून त्यांना कमजोर करून आरक्षण काढण्याचे काम काँग्रेस करेल. त्यामुळे जनतेने सावध राहावे आणि हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे. ही निवडणूक देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारी आहे. देश विरोधी ताकद यांना धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे, असं मत नरेंद्र मोदी यांनी पुण्यात व्यक्त केले.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, मी महाराष्ट्र मध्ये विविध भागात फिरलो असून जनतेचे अभूतपूर्व समर्थन मला मिळत आहे. विमानतळ ते सभा स्थळ अनेक लोक गर्दी करून अभिवादन करत होते. महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत येईल. पुणे आणि भाजप यांचा संबंध विचार, संस्कार, आस्था असा आहे. महायुती सरकार आगामी काळात वेगाने विकास करेल. पुण्यात पुढील पाच वर्ष विकासाची नवीन उड्डाण करण्याची असतील.
परकीय गुंतवणूक मध्ये रेकॉर्ड ब्रेक देशात गुंतवणूक झाली असून गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात या भागात नवी गुंतवणूक होत असून स्टार्टअप द्वारे तरुणांना लाभ मिळाला आणि रोजगार निर्मिती झाली. पुण्याचा ऑटोमोबाईल क्षेत्र वेगळी ओळख आहे. नागरिकांची स्वप्ने आणि आवश्यकता या माझ्या ऊर्जा आणि योजना कामाचा आधार आहे.