राहुलकुमार अवचट
यवत – पपू ज्ञानेश्वर हरी काटकर, प्रज्ञापुरी ( कोल्हापूर ) यांच्या प्रेरणेने व प.पू. श्री गोविंद वासुदेव रानडे, नामस्मरण कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनात साईबाबा पालखी सोहळा समिती कराड आयोजित श्री क्षेत्र शिर्डी ते कराड पायी पालखी सोहळ्याचे चौफुला येथील बोरमलनाथ मंदिर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. बोरमलनाथ मंदिर येथे पालखी स्वागतासाठी रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
श्री साईचरण सेवा मंडळ , यवत व साई आॕटो परिवार यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती आज सकाळी नागरगाव (ता.शिरुर) येथील मुक्काम आटोपुन पालखी दुपारच्या विसाव्यासाठी चौफुला येथे विसावली दुपारी १२ वा. श्री साईंची माध्यांन्ह आरती करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आले.
दत्तजयंती उत्सव निमित्ताने पालखी सोहळा आयोजित केला जात असुन पालखीचे हे २२ वे वर्ष असुन पालखी सोहळ्यात कराड, वाठार किरोली , मसुर , पेठ नाका , कोल्हापूर , सांगली येथील अनेक साईभक्त सहभागी झाले असल्याचे पालखी सोहळा प्रमुख उद्यसिंह देसाई यांनी सांगितले.
अखंड चालणारा “साई साई हरे हरे,साई राम हरे हरे ” हा जप करत पायी वारी करणारे भक्त कराड कडे मार्गस्थ झाले आजचा मुक्काम सुपे ( ता.बारामती ) येथे असुन दि. ०६ डिसेंबर रोजी पालखी कराड येथे पोहचले व दि. ०७ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. यावेळी श्री साईचरण सेवा मंडळ, यवत सर्व पदाधिकारी व परिसरातील असंख्य साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.