नवी दिल्ली : देशाची राजधानी पुन्हा एकदा लाजिरवाणी झाली आहे. दिल्लीत आणखी एक निर्भया प्रकरण उघडकीस आले आहे. दिल्ली पोलिसांच्या जुन्या मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर असलेल्या आयटीओमध्ये एका मुलीसोबत क्रूरतेची परिसीमा ओलांडण्यात आली. तिघांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ऑटोचालकानेही ऑटोमध्ये मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
ही घटना १० आणि ११ ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे मुलीचे मानसिक संतुलन बिघडले. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद बाबू, प्रभू महातो आणि मोहम्मद शमसुल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित मुलगी ओडिशातील असून, ती कामाच्या शोधात दिल्लीत आली होती. मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ७०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि १५० हून अधिक रिक्षाचालकांची चौकशी केली आणि त्यानंतर तिघेही पकडले गेले.
वारंवार अत्याचार केल्याने मुलीचे मानसिक संतुलन बिघडले. ओडिशाची राहणारी मुलगी (वय ३४) अर्धनग्न अवस्थेत राजघाट येथून चालत सराय काले खान येथे पोहोचली. मुलीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त वाहत होतं. त्यावेळी नौदलाच्या अधिकाऱ्याने ही मुलगी सराई काळेखान येथे पाहिल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दक्षिण-पूर्व जिल्हा पोलीस उपायुक्त रवी कुमार सिंग यांनी आरोपीच्या अटकेला दुजोरा दिला आहे. आरोपीला अटक केल्यानंतर पीडित मुलीवर झालेला अत्याचार समोर आला आहे. पीडितेवर अद्याप उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पकडलेल्या तीन आरोपींची ओळख पटली आहे.