लोणी काळभोर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात. यासाठी मागील तीन दिवसांपासून लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर, कुंजीरवाडी, कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरात रूट मार्च काढण्यात आला आहे.
या रूट मार्चमध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, गोपनीय विभागाचे प्रमुख रामदास मेमाणे, 38 अंमलदार, सीमा सुरक्षा बलाचे 2 अधिकारी 23 जवान सहभागी झाले होते.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दल सज्ज आहे, असा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील संवेदनशील मतदान केंद्र परिसरात तसेच गर्दीच्या ठिकाणी रूट मार्च व एरिया डॉमिनेशन घेण्यात आले आहे.
क्षेत्र वर्चस्व मार्ग
मार्ग क्र 1)
थेऊर पोलीस चौकी-चिंतामणी विद्या मंदिर शाळा -ग्रामपंचायत कार्यालय- पेशवे वाडा -चिंतामणी मंदिर- बौद्ध वस्ती- दत्तनगर -सखाराम नगर- थेऊर बस स्टॉप -जिल्हा परिषद शाळा -काकडे कॉलनी – थेऊर पोलीस चौकी.
मार्ग क्रमांक 2)
पुणे सोलापूर हायवे सर्विस रोड -संभाजीनगर-कदम वस्ती- पाठारे वस्ती -घोरपडे वस्ती -इंदिरानगर -पालखी तळ -पाषाणकर बाग -आलमगीर मज्जित – श्री छत्रपती उद्यान -अंबरनाथ मंदिर -छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराज शिल्प चौक -कन्या प्रशाला- गणपती मंदिर चौक -न्यू बिग बाजार चौक- खोकलाई देवी मंदिर चौक -दत्त मंदिर चौक- लोणी काळभोर पोलीस ठाणे.
मार्ग क्रमांक 3 )
कुंजीरवाडी चौक-बाजारतळ- जुना कॅनॉल- कुंभारवाडा -गारुडी वस्ती -माळवाडी -जिल्हा परिषद शाळा -सर्वांगीण ग्रामीण विकास विद्यालय- आळंदी रोड- नायगाव फाटा -पुणे सोलापूर रोड सर्विस रोड ने पुन्हा कुंजीरवाडी चौक
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी. व सर्व घटकातील नागरिकांनी कायद्याचे पालन करावे. जर या दरम्यान कोणी कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार.
-राजेंद्र करणकोट (वरिष्ठ पोलीस निरीक्षक – लोणी काळभोर पोलीस ठाणे)