पुणे : छगन भुजबळ यांनी सरदेसाई यांच्या पुस्तकात केलेल्या कथित दाव्यावर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका पुस्तकातील दावा अतिशय गंभीर विषय आहे. मी अनेकदा बोलले आहे, घर फोडणे, पक्ष फोडणे हे मी गेले अनेक दिवस बोलत आहे. काश्मीर टू कन्याकुमारीमध्ये इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचा 95 टक्के वापर केला आहे वॉशिंग मशीनमध्ये टाकून भाजप सरकार स्थापन करत आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
इन्कम टॅक्स, सीबीआय ईडी याचा वापर केला जात आहे. हे अदृश्य शक्तीने माझ्या बहिणीवर घरी रेड केली. पाच दिवस रेड केली, ईडी ने त्रास दिला. भुजबळ, मलिक, राऊत यांचा कुटुंब कशातून गेले असतील. फडणीवस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार यांना फाईल दाखवली. ते मुख्यमंत्री असताना कारवाई त्यांनी केली. फाईल दाखवली, देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर खटला दाखल झाला पाहिजे, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात सुनेत्रा पवार यांचा सुद्धा उल्लेख आहे. त्यांचं कशाला नाव आणायचं. याची काय गरज होती का? माझ्या बहिणीच्या घरी रेड करण्याचं कारण काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. शरद पवार यांना दोन-तीन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवार यांनी भाजप सोबत जाण्यासाठी नकार दिला, असे पुस्तकात सांगण्यात आले आहे. असेही त्या म्हणाल्या.
आरटीआय फाईल तुम्ही टाका किती तुम्हाला फाईल पाहायला मिळतात हे बघू . अजित पवार यांच्यावर पहिला आरोप हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर फायनल सही फडणवीस यांची होती. म्हणून फडणवीस यांनी सही केली, अजित पवार यांना घरी जाऊन त्यांनी फाईल दाखवली, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.