बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर उपसा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य नियोजन करून आणि कोणतेही राजकारण न करता पुरंदर उपसा सिंचन योजना कार्यक्षमतेने चालवली आहेच. पुरंदर उपसामुळे तालुक्यातील ऊस उत्पादन वाढले आहे. त्यामुळे 2019 पर्यंत असणारे ऊसाचे 50 हजार टन उत्पादन, आता सात लाख 25 हजार टनापर्यंत गेले आहे. याबरोबरच फळबागा, फुल शेती आणि भाजीपाला उत्पादनात मोठी वाढ झाल्याची माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांनी दिली.
अटल भूजल आणि पुरंदर योजनेसाठी मंजूर 48 कोटीच्या निधीतून उर्वरित जलवाहिनीची कामे सौरऊर्जेची जोड यामुळे लाभ क्षेत्रातील सर्व क्षेत्र जमीन ओलिताखाली आणण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकरी कष्टाळू असून, सीताफळ इस्टेट, अंजीर जीआय टॅंगिंग, सहकारी साखर कारखाना, शेतमालावर प्रक्रिया उद्योग यामुळे शेतकरी समृद्ध होणार असल्याचा विश्वासही संजय जगताप यांनी व्यक्त केला.
सासवड येथे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आमदार संजय जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ सासवड येथे करण्यात आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष यशवंत जगताप, रमेश कारभारी जगताप, विनोद जगताप, राहुल गिरमे, अजित जगताप, प्रवीण महामुनी, सुरज उत्तम जगताप, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोडे, वैभव जगताप, रोहित इनामके, तुषार जगताप, भैय्या महाजन, राजेंद्र जगताप, संजय चौखंडे यासह ग्रामस्थ व महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.