नवी दिल्ली : सध्या WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक खास फीचर आणले आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स इन्स्टंट मेसेजिंग ॲपवरच गुगल सर्च फीचर वापरू शकतील. मेटाच्या या ॲपद्वारे, युजर्स ॲपमध्येच असलेल्या इमेजेस मिळवू शकतात.
WhatsApp ने नुकतेच बीटा व्हर्जनसाठी हे फीचर जारी केले आहे. ज्याचा फायदाही अनेकांना होणार आहे. Wabetainfo ने ही माहिती दिली आहे. सर्व टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर, ते इतरही व्हर्जनसाठी लाँच केले जाणार आहे. WhatsApp च्या येणाऱ्या फीचर्सची माहिती Wabetainfo या वेबसाईटवरून दिली जाते. या फीचरचे नाव Search Images On The Web आहे. हे फीचर व्हॉट्सॲप बीटा अँड्रॉइड 2.24.23.13 वर आले आहे.
WhatsApp च्या या फीचरच्या मदतीने युजर्सना मिळालेली इमेज थेट गुगल सर्चमध्ये ॲपवरून शोधता येईल आणि त्या इमेजची सत्यता तपासता येईल. Wabetainfo ने या फीचर्सबद्दल तपशीलवार माहिती देण्यासाठी स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. व्हॉट्सॲपवर येणाऱ्या इमेजेस थेट गुगलवर सर्च केल्या जाऊ शकतात, असे या स्क्रीनशॉटमध्ये दाखवण्यात आले आहे.