पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण, आता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 31 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई येथे ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे.
सदर मुलाखत ही 21 नोव्हेंबर 2024 रोजी कॉन्फरन्स हॉल, असोसिएट डीन कार्यालयाशेजारी, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई – 400 012 येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.mafsu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / बायोमेडिकल किंवा एम.व्ही. अनुसूचित जाती किंवा एम. फार्म. फार्मास्युटिक्स / फार्माकोलॉजी, नेट / गेट / कोणत्याही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 31,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 21 नोव्हेंबर 2024.