दौंड : दौंड तालुक्यात महायुतीचे उमेदवार राहुल कुल व महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्यात लढत होत असून आज बोरीऐंदी येथील तरुणांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला माझे. तर दुसरीकडे माजी आमदार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ राहू बेटात महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत. त्याला नागरिकांचा तसेच प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे
दौंड तालुक्यातील बोरीऐंदी या गावातील युवकांनी आणि जेष्ठ कार्यकर्त्यांनी आज आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार राहुल कुल यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवू असा निर्धार यावेळी युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विशाल झुरंगे, अमोल शेलार, संचालक बोरीऐंदी सोसायटी प्रतीक गायकवाड, शुभम गायकवाड, शशिकांत झुरंगे, ऋत्विक झुरंगे, मारुती झुरंगे, स्वप्निल झुरंगे, योगेश गायकवाड, सागर गायकवाड, माणिक भोसेकर, कैलास काळे, गणेश पवार, सौरभ गायकवाड, तेजस गायकवाड, राकेश गायकवाड, दत्तात्रय फराटे, प्रफुल गायकवाड, नाना गायकवाड, शहाजी शेलार इत्यादी कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
राहुल कुल यांना बोरीऐंदी गावातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी केला आहे. गेल्या महिन्याभरात आमदार राहुल कुल यांना मिळणारा पाठिंबा पाहता राहुल कुल हे मोठ्या मताधिक्याने दौंड विधानसभेतून विजयी होतील अशी चर्चा कुल समर्थक करत आहेत. तर दुसरीकडे आज राहू बेटातील टेळेवाडी, वडगाव बांडे, पानवली, कोरेगाव भिवर या गावात महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ संवाद बैठका घेण्यात आल्या होत्या यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दौंड शुगरचे वीरधवल जगदाळे, बादशाह शेख, राजाभाऊ तांबे, वसंत साळुंखे यांनी माघार घेतल्याने रमेश थोरात यांचे पारडे जड झाल्याची चर्चा थोरात समर्थक व्यक्त करीत आहेत.